गिरवी:-(फलटण)-गिरवी येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गिरवी येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी.
गिरवी (फलटण):-
फलटण तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,क्रिडा क्षेत्रातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या गिरवी गावात गोकुळाष्टमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमी दिवशी गावातून परम ईश्वर श्रीकृष्ण यांच्या पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदायातील अनेक आबालवृद्ध उपस्थित होते.टाळचिपळ्यांच्या व मृदंगाच्या साथीत वाजतगाजत गावातील प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा संपन्न झाला.पालखी मार्गावर अनेक ठिकाणी देवदर्शनाला महिला, वयोवृद्ध व्यक्ती, वारकरी, ग्रामस्थ,भाविकांनी गर्दी केली होती. गावातील बाजार मैदानावर वारकरी भाविक श्रद्धेने फुगडी,फेर, धरून नाचू लागले होते.
गोकुळाष्टमी निमित्ताने हरिनाम सप्ताहात भजन कीर्तन प्रवचन अन्नदान असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गिरवी गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षापासून वंशपरंपरागत गोकुळाष्टमी उत्सव वेगवेगळ्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन साजरा करण्याची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.गोपाळकृष्ण मंदिर हे गिरवी गावातील आध्यात्मिक क्षेत्रातील धार्मिक विश्वातील वैभव आहे.वारकरी संप्रदायातील अनेक भाविक नित्यनेमाने गोपाळकृष्ण मंदिर येथे देवदर्शनाला येतात.