गिरवी:-(फलटण)-भारतीय स्वातंत्र्य लढा प्रेरणादायी: श्रीमती शारदादेवी कदम.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भारतीय स्वातंत्र्य लढा प्रेरणादायी: श्रीमती शारदादेवी कदम.
गिरवी ता. फलटण:- भारतीय स्वातंत्र्य लढा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल असा आहे.भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर देशभक्त स्वातंत्र्य सैनिक यांचा गौरवशाली इतिहास व वारसा सातारा जिल्ह्याला आहे.असे विचार मौजे गिरवी ता फलटण जि सातारा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी येथील भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव व सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती शारदादेवी कदम यांनी अध्यक्षीय पदावरून व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी येथील ध्वजारोहण श्रीमती शारदादेवी कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी एनसीसी कॅडेट ग्रुपच्या वतीने ध्वजारोहण प्रसंगी भारतीय तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली.
प्रास्ताविक प्राचार्य संजयकुमार सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार यांनी केले.
यावेळी पंचरंगी सामुदायिक कवायत,मैदानी कसरती यांचे सादरीकरण विद्यार्थी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गिरवी ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली कदम, उपसरपंच संतोष मदने,गिरवी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक निकाळजे,गिरवी गावातील प्रकाश कदम, राजेंद्र कदम, यशवंत कदम,चंद्रकांत निकाळजे, राजेंद्र वाघ,समिर सस्ते, पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.