कराड:-स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा.

कराड:- लाहोटी कन्या प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते नववी मधील विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये गणित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या गणिताच्या वर्किंग मॉडेल्स चे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये 50 मॉडेल्स मांडण्यात आली होती. गणिता विषयीची भीती दूर करणे, दैनंदिन जीवनात गणित कसे उपयोगी आहे याची माहिती देणे, गणिताशिवाय जीवन व्यर्थ आहे, गणित हा जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला मित्र आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दैनंदिन जीवनात गणित कसे उपयोगी आहे याची माहिती या निमित्त विद्यार्थिनींना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थिनींनी गणिताला आपला शत्रू न मानता मित्र मानावे असे सांगण्यात आले. यानिमित्त सातवी अ मधील विद्यार्थिनींनी गणित शिक्षक श्री. विकास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या दोन भित्तिपत्रकांचे उद्घाटन ही मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाची पाहणी तसेच विद्यार्थिनींना संबंधित मॉडेल्सची माहिती सर्व गणित शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांनी विचारली त्याची उत्स्फूर्तपणे माहिती विद्यार्थिनींनी दिली. सौ हेमलता जंगम मॅडम यांनी या प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थिनींचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या यावेळी गणित विभाग प्रमुख श्री. बाळासाहेब देसाई सर, सर्व गणित शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शौर्या शेळके, थोर भारतीय गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन परिचय कु. रिजूल डोईफोडे हिने आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना करून दिला, आभार कु.विभा सुर्यवंशी हिने मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्ञानदा थोरात हिने केले या सर्व विद्यार्थिनी सातवी अ मधील होत्या. प्रदर्शन मांडणी सौ.जानवी नावडकर आणि सौ सीमा पाटील मॅडम यांनी केली. गणिती रांगोळी सौ. सत्वशीला नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नववी क मधील विद्यार्थिनींनी काढली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि नीटनेटका होण्यासाठी सौ अश्विनी कुंभार , सौ संगीता माळी , सौ रुपाली काकडे मॅडम आणि श्री प्रशांत कसबे, श्री. बांगर यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम, पर्यवेक्षिका सौ अवघडे मॅडम, संस्था नियुक्त पर्यवेक्षक श्री. कुंभार सर, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.




