कातरखटाव:-येथील सिद्धनाथ इंजिनिअरिंग वर्क्स या नवीन शेती अवजारांच्या दुकान चे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते.
प्रतिनिधी करण शिंगाडे:-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कातरखटाव (सातारा ) ता.22 = कातरखटाव येथील सिद्धनाथ इंजिनिअरिंग वर्क्स या नवीन शेती अवजारांच्या दुकान चे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते फीत कापून व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी तानाजी काटकर सदस्य माण पंचायत समिती,ॲड.कांचन बोडके सरपंच ग्रा.प.कातरखाटव,ॲड.नितीन शिंगाडे उपसरपंच,संतोष बागल सदस्य ग्रा.प.का-खटाव,हिंगणे चे निकमशेठ,बाळासाहेब पाटील माजी चेअरमन सोसायटी,नामदेव बागल माजी चेअरमन सोसायटी,वेंकट बागल, नाना शिंदे माजी चेअरमन सोसायटी,डॉ.वैभव माने सरपंच नढवळ,हिंदुराव बोडके माजी सरपंच,डॉ.आकारम बोडके,सुशील तरटे,अमोल पाटील तसेच जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी व कर्मचारी तसेच सोसायटीचे सचिव इत्यादी.मान्यवर उपस्थित होते.आलेले सर्वांचे नितीन नैगण यानी स्वागत केले या वेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले या दुकानाच्या माध्यमातून कातरखटाव परिसरातील शेतकऱ्यांना नवीन शेती अवजारे मिळणार आहेत येथे नवीन नवीन उद्योगधंदे उभे राहण्यास बँकेतून मदत करणार आहे
यावेळी बोलताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यानी नितीन नैगण या युवक कार्यकर्त्यांने या गावांमध्ये नवीन उद्योग धंदा करायचे ठरवले त्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठबळ दिले आहे कातरखटाव परिसरामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाच प्रकरणांना बिनव्याजी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दिले आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी सभासदांनी व गावातील युवकांनी,महिलांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे सांगितले यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या असलेल्या 75 योजना तसेच केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना ज्याच्या माध्यमातून सबसिडी कशी मिळते याची सविस्तर माहिती सांगितली.
ॲड.नितीन शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले.