क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून दोन जणांकडून एकाचा खून.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

चिंचवड येथे किरकोळ कारणावरून
दोन जणांनी एकाचा खून केला.
चिंचवड, दि. 26 (शफिक शेख) – ‘‘आई-बहिणीवरून शिवी का देतोस’’, असे विचारल्याने चिडून जाउन दोन जणांनी मिळून एकाच दगडाने ठेचून एकाचा खून केला.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी सांगितले की, दि. 24 सप्टेंबर रात्री 10.30 ते 25 सप्टेंबर सकाळी 8.46 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय सागर निलप्पा कांबळे हा चिंचवड येथील गणपती मंदिराशेजारील कुणाल प्लाझा येथे आरोपी सहदेव उर्फ सद्या सरवदे आणि त्याचा एक साथीदार याच्यासोबत बोलत असताना. बोलता बोलता आई-बहिणीवरून शिवीगाळ झाली. त्यावर आई-बहिणीवरून शिव्या देवून नकोस असे सागर कांबळे याने दोघांना सांगितले असता दोघांनाही राग आला त्यामुळे बाचाबाची वाढली आणि बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले. चिडून जावून दोन्ही आरोपींनी सागर कंाबळेच्या चेह-यावर, हनुवटीवर, डाव्या डोळयाच्या भुवईवर दगडाने खूप मारहाण केली तसेच लाथा बुक्क्यांनी देखील भरपूर मारहाण केली. हा मार एवढा जबरी होता की त्यामध्ये सागर कांबळे हा जागेवर मृत्यू पावला. त्याला मेलेला पाहताच दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.
दिनांक 25 सप्टेंबर रोजी सागरला शोधायला निघालेल्या त्याच्या मोठया भाउ अविनाश निल्लप्पा कांबळे यास चिंचवड येथील गणपती मंदिराशेजारील कुणाल प्लाझा च्या भिंतीलगत सागर कांबळे चा मृतदेह आढळून आला. त्याने त्वरित निगडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली असता सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी तत्परतेने भा.द.वि. कलम 302, 323 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आणि वेगाने आपली तपास चक्रे फिरवली आणि दोन्ही आरोपींना शोधून अटक केली. त्यांस न्यायालयात उभे केले असता त्यांना 1 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे संपूर्ण परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button