ताज्या घडामोडी

सातारा:-सातारा जि.प.वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शुभारंभ उद्या

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा जि प वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शुभारंभ उद्या

सातारा दि: सातारा जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव निमित्त दिनांक १० ते१२ जानेवारी या कालावधीमध्ये विविध स्पर्धा होत आहे .या स्पर्धेचे उद्घाघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होत आहे. सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी वर्ग सध्या सराव करण्यामध्ये गुंतलेले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रोत्सानामुळे अनेक सातारा जिल्हा परिषद कर्मचारी खेळाडू मोठ्या जोमाने सराव करत आहेत. अगदी टपाल विभागापासून ते सर्वच विभागात सध्या कर्मचारी वर्ग स्पर्धेच्या बाबतीत जागृरकपणे सराव करत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनातील ताण तणाव कमी करण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असून या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील प्रमुख मंत्री खासदार आमदार व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती लक्ष विधी ठरणार आहे.
सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद् यांच्यासमवेतच सर्व वर्गाचे वरिष्ठ अधिकारी ,गटविकास अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील चार मंत्री, तीन खासदार ,चार आमदार त्याचबरोबर विधान परिषद सदस्य यांची उपस्थिती यामुळे खेळाडू व कर्मचारी व्यतिरिक्त या ठिकाणी पक्षीय कार्यकर्ते व सातारा जिल्हा परिषदेमध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
……………………………

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो -जिल्हा परिषद कर्मचारी सराव करताना नेमका कबड्डीच्या सराव मध्ये एकमेकांचे पाय वाढताना (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button