वाई:-‘किसन वीर’ मध्ये एन.एस.एस.चे स्वयंसेवक व एन.सी.सी.छात्रांचे वृक्षारोपण.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.17
‘किसन वीर’ मध्ये एन.एस.एस.चे स्वयंसेवक व एन.सी.सी.छात्रांचे वृक्षारोपण.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी ओझोन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात वृक्षारोपण केले.
१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. वातावरणातील ओझोनचा थर कमी झाला तर, सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. ओझोनचा थर विरळ होत निघाल्याने पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढत आहे. ही आज जगासमोरील मोठी समस्या आहे. त्या समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. याला अनुसरून महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला.
प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, कॅप्टन डॉ. समीर पवार, डॉ. अंबादास सकट, ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. आनंद घोरपडे यांनी नियोजन केले. याप्रसंगी उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. शिवाजी ताटे, श्री. संदीप पातुगडे व कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. वृक्षारोपणात वरिष्ठ विभागातील एन.एस. एस.च्या स्वयंसेवकांनी व एन. सी. सी. छात्रांनी सहभाग घेतला.