ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विक्रमशील कदम(बाबा)यांच्या हस्ते कळंबी ता.खटाव येथे विविध विकासकामांचा उदघाट्न सोहळा संपन्न.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

  • मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

विक्रमशील कदम(बाबा)यांच्या हस्ते कळंबी ता.खटाव येथे विविध विकासकामांचा उदघाट्न सोहळा संपन्न.

मौजे कळंबी ता.खटाव येथे महाराष्ट्र शासनाच्या २५१५ या शिर्षकाखाली मा.आ.जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून,कराड उत्तरचे युवा नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद पूसेसावळी गटाचे युवा नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. विक्रमबाबा कदम यांच्या अथक प्रयत्नातून तसेच कळंबी गावातील आजी-माजी सरपंच,उपसरपंच,चेअरमन, व्हा.चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य, सो.संचालक,यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या १० लक्ष रुपये किमतीच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.मा.आ.जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनातून धैर्यशील दादांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण केली जातील त्याचबरोबर गावातील शेती,पाणी आणि रोजगाराचा प्रश्न ताकतीने सोडवला जाईल अशी ग्वाही विक्रमबाबांनी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना दिली त्यावेळी उपसरपंच सतीश काळे यांनी पक्ष,पार्टी,गट तट सोडून आ.जयकुमार गोरे भाऊ,मा.धैर्यशील दादा कदम,मा.विक्रमबाबा कदम यांच्या पाठीमागे संपूर्ण गाव ठामपणे उभे राहिल अशी ग्वाही ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिली.
यावेळी पूसेसावळी गावचे युवा नेते महेश पाटील,मा.सरपंच अकबर बागवान, नामदेव फडतरे,विजय कुंभार,कळंबी गावच्या सरपंच सौ.दिपाली ढोले, उपसरपंच सतीश काळे,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हरिदास सावंत, मा.पं.स.स.मधुकर काळे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पवार, मा. उपसरपंच संदीप काळे, मा.चेअमन व ग्रा.पं.सदस्य संजय घाडगे,मा. सरपंच सदाशिव घाडगे, दिपक घाडगे, मा.ग्रा.पं.सदस्य कुमार काळे, ॲड.आबासो घाडगे,सो.संचालक दादासो घाडगे,मा.ग्रा.पं.सदस्य समाधान करे, विवेकानंद घाडगे,शरद इनामदार,बाबासो फडतरे, रामचंद्र घाडगे,कृष्णत फडतरे,सुहास घाडगे,अधिक सावंत,शंकर सगरे,संजय सगरे,बाबासो शिकलगार, मिलिंद वाळुंबे,पप्पू ढोले व कॉन्ट्रॅक्टर अभिजीत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button