वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई .दि .11
जनता शिक्षण संस्थेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त किसन वीर महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. १२ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. जनता शिक्षण संस्था संचलित किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळांमधील गुणवंत व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या गुणगौरव सोहळ्यासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध साहित्यिक प्रा. कृष्णात खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून; जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार श्री. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे सर, संस्थेचे सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, वरिष्ठ महाविद्यालयातील तीन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. भिमराव पटकुरे, डॉ. चंद्रकांत कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्र. उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व संस्थेतील आजी-माजी शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी दिली.