भिवंडी:-देवा ग्रुप फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या राज्यव्यापी संपाला जाहीर पाठिंबा.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
देवा ग्रुप फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या राज्यव्यापी संपाला जाहीर पाठिंबा.
दि.२०.०२.२०२३ पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र व्यापी संपाला देवा ग्रुप फाउंडेशनमार्फत जाहीर पाठिंबा देण्यात आलेले असून त्याबाबतचे पत्र डॉ.श्री.तानाजी भाऊ मोरे (सचिव), श्री.निलेश भाऊ कासार (सह सचिव – संघटक) यांचेमार्फत सादर करण्यात आले.
ह्या संपाच्या पदयात्रेवेळी अनेक अंगणवाडी सेविका ह्यांनी देवा ग्रुप फाउंडेशनच्या विविध पदाधिकारी, सदस्यांची तसेच ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे सरपंच, उपसरपंच व कमिटीची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले.
देवा ग्रुप फाउंडेशन, महा.राज्य.
नोंदणी : महा / १८८६ / १५ / ठाणे.