क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:- बंद घराचा दरवाजा तोडून! जिंती ता फलटण येथे ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला.

पत्रकार शुभम भास्कर फलटण तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार शुभम भास्कर फलटण तालुकाध्यक्ष

५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला बंद घराचा दरवाजा तोडून! जिंती ता फलटण येथे.

प्रतिनिधी शुभम भापकर

जिंती ता फलटण गावातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या कपाटातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबतची फिर्याद आदित्य रणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी, जिंती गावातील कार्पोरेशन बंगला येथे राहणारे मेडिकल व्यावसायिक आदित्य अशोक रणवरे हे कुटुंबीयांसमवेत रविवारी सकाळी ११ वाजता तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एका बेडरूम मधील कपाटातील 35 तोळ्याचे व दुसऱ्या बेडरूम मधून १५ तोळे सोन्याचे दागिने असे एकूण ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले सोमवारी सकाळी ७.३० वाजता रणवरे कुटुंबीय तुळजापूर मध्ये असताना त्यांना नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडल्याची माहिती दूरध्वनीवरून सांगितली माघारी आल्यानंतर घरातील ५० तोळे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन सातारहून डॉग स्कॉड बोलावून घेतले होते जिंतीतील भर वस्तीत झालेल्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button