वाई:- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व सामाजिक भान निर्माण करणारे प्रभावी माध्यम : स्वाती हेरकळ
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई: दि.9
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व सामाजिक भान निर्माण करणारे प्रभावी माध्यम : स्वाती हेरकळ
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व सामाजिक भान निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन स्वाती हेरकळ यांनी केले. किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटक म्हणून रोटरी क्लब वाई च्या स्वाती हेरकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून बेल एअर हॉस्पिटलचे फादर टॉमी यांचे प्रतिनिधी म्हणून मा. श्री. जितिन जोश,यशोधन अनाथ आश्रमाचे संचालक व राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार मा. श्री. रवी बोडके उपस्थित होते. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना स्वाती हेरकळ म्हणाल्या की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व समाजभान निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून जगातील दोनशे पेक्षा जास्त देशात मानवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य केले जाते. वाई मधील दुर्गम भागातील लोकांच्या मूलभूत गरजा जसे की, पाणी, वीज व आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊन ते गाव स्वयंपूर्ण केले आहे .महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करत असताना असे गाव निवडावे की, ज्या गावात पाणी, वीज, आरोग्य व सामाजिक समस्या असतील असे गाव निवडून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यात रोटरी क्लब, वाई आपल्या सोबत असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
बेल एअर हॉस्पिटलचे श्री. जितीन जोश म्हणाले की, ‘रेड क्रॉस’ या जागतिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जगातील सुमारे १९१ देशात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रेड क्रॉस ही संस्था पूर्णतः नि:स्वार्थ सामाजिक कार्य करणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून पाचगणी, महाबळेश्वर या दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यविषयक जाणीव- समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या कामी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन समाज कार्यात भरीव योगदान द्यावे.
यशोधन अनाथ आश्रमाचे संचालक श्री रवी बोडके विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, मी जे घडलो त्याची प्रेरणा मला राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमातून मिळाली. विद्यार्थीदशेत असताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात मी हिरिरीने भाग घेत होतो. त्यामुळे सामाजिक समस्यांची जाण त्यावेळी झाली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, समाजभान, सामाजिक कुप्रथा याची जाणीव होते, विद्यार्थ्यांनी हे प्रश्न विचारात घेऊन कार्य करावे.
संस्थेचे अध्यक्ष मा.मदनदादा भोसले यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्वाती हेरकळ, जितीन जोश व रवी बोडके यांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असून त्याचा आदर्श समोर ठेवून समाजकार्यात सहभागी व्हावे. तसेच महाविद्यालयाने बेल एअर हॉस्पिटल,पाचगणी या संस्थाशी सामंजस्य करार केला. याशिवाय यशोधन अनाथाश्रम, रोटरी क्लब, वाई यांच्यासमवेत देखील सामंजस्य करार करून समाजोपयोगी उपक्रम, सामुदायिक प्रकल्प राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हाती घ्यावेत, अशीही सूचना केली.
प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, समाजकारणातील अशा मान्यवर व्यक्तींच्या अनुभवसंपन्न कार्यातून राष्ट्रकार्य-समाजकार्य व प्रबोधनाची स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.
कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुषा इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ. आनंद घोरपडे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी मानले. तर सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. सायुरी सणस व दत्ताजी महांगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.