आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यातील नटराज मंदिरात वार्षिक भजनी मेळाव्यास शुभारंभ ….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यातील नटराज मंदिरात वार्षिक भजनी मेळाव्यास शुभारंभ ….

सातारा : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात बुधवार दिनांक २६ जून ते रविवारीपर्यंत दि. ३० जून पर्यंत अत्यंत धार्मिक वातावरणात वार्षिक भजन मेळावा सुरू झालेला आहे. या मेळाव्याला येणाऱ्या भाविकांसाठी पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप तयार करण्यात आला असून सलग पाच दिवस अल्पोपहारासह दोन वेळ मोफत अन्नदान केले जाणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरात किमान पाचशे कुटुंब खास या कार्यक्रमासाठी येणार असल्याने त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था परिपूर्ण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण सातारा शहरात तयार झाले आहे.
चेन्नई येथील भगवंत नाम प्रचार मंडळीच्या वतीने २१ वा वार्षिक भजन महोत्सव साताऱ्यात होत आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी नटराज मंदिरात पत्रकार परिषद झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक गोपी भागवत, श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, नारायण राव आदी उपस्थित होते. श्री कांची कामकोटी मुलम्यान सर्वज्ञ पीठम, कांचीपुरुमचे प पू शंकराचार्य, श्री श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी, प पू श्री श्री श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी व विद्यमान पीठाधीश्वर प पू श्री श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने हा मेळावा होत आहे.
या मेळाव्यासाठी मंदिर व मंदिराबाहेर भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामधील सभामंडपामध्ये दररोज भजनसेवा होईल. मंदिराबाहेरील हॉलमध्ये अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री मोफत अन्नदान होईल. मेळावा कालावधीत विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध मान्यवर मेळाव्यात भेट देणार आहेत. तसेच भाविक वर्गही या ठिकाणी भेट देणार आहेत.
दरम्यान, या मेळाव्यात सकाळी सात ते दुपारी एक तसेच संध्याकाळी तीन ते रात्री साडेआठ या वेळेत जेष्ठ भागवतकरांकडून भजन सेवा होईल. दि. २६ ते २८ जूनदरम्यान सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत महारुद्र अनुष्ठान होणार आहे. दि. २८ जून रोजी महारुद्र अनुष्ठानाची होम-हवनाने सांगता होईल. दि. ३० जून रोजी श्री राधा कृष्ण कल्याणम (लग्न सोहळा) व प पू शंकराचार्य, श्री श्री श्री महास्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना पुष्प लक्षार्चना नियोजित आहे. सर्व भाविक भक्तांनी या भजन मेळाव्यास उपस्थित राहून श्री शिवकामसुंदरी व आनंद नटराज आणि प पू शंकराचार्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या मेळाव्यासाठी तयारी करण्यात आली असून आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू ,मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व अनेक राज्यातील मान्यवर हे साताऱ्यात दाखल झालेले आहेत.


ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button