महाबळेश्वर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचा राज्य सरकार विरुध्द विराट मोर्चा.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष:-9403546485
महाबळेश्वर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचा राज्य सरकार विरुध्द विराट मोर्चा.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष पणे लाठीचार्ज केल्याची घटना घडली असताना या घटनेचे पङसाद संपूर्ण राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दि•५/९/२०२३ रोजी महाबळेश्वर शहरातून राज्य शासनाविरोधी निषेध मोर्चा काढत सकल मराठा समाजाने संयमाचे दर्शन घडवले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन या शांतता पुर्ण वातावरणात मोर्चास सुरुवात करण्यात आली.या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या निषेध मोर्चामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मुस्लीम समाज बांधवांसह इतर समाजातील समाज बांधवांनी आपला सक्रीय पाठिंबा दर्शवत या मोर्चात सहभाग घेतला होता.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन मुख्यबाजार पेठ ङाॅ.साबणे रोङ ते बस स्टॅंङ पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता मखारिया गार्डन येथील चौकात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.तेथे सकल मराठा आंदोलकांनी आपल्याला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठ या घोषणा देत संपुर्ण परिसर दणाणून सोङला होता.तद नंतर हा मोर्चा तहसिलदार कार्यालय येथे येऊन तहसिलदार तेजस्विनी पाटील मॅडम यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देवुन तहसिलदार कार्यालया बाहेर निष्क्रीय राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात महाबळेश्वर तालुक्यातील बहु संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा मनोदय यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.