पुणे :-कृषी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भीमथडी यात्रेचा जल्लोषात शुभारंभ.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे :-कृषी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भीमथडी यात्रेचा जल्लोषात शुभारंभ.

पुणे :- पुणे कृषी महाविद्यालय (अग्रिकल्चर कॉलेज) यांच्या ऐतिहासिक व प्रशस्त ग्राउंडवर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा जपणारी भीमथडी यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भरली आहे. शेतकरी, कष्टकरी, कारागीर आणि ग्रामीण जीवनशैलीचे जिवंत दर्शन घडवणारी ही यात्रा पुणेकरांसाठी एक पर्वणी ठरत आहे.
भीमथडी यात्रेत राज्यभरातून आलेले शेतकरी, महिला बचत गट, हस्तकला कारागीर, लोककलावंत सहभागी झाले असून, देशी उत्पादने, पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला, शेती अवजारे, लोककला व संस्कृतीचे रंगतदार प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पोवाडा, शाहिरी कार्यक्रमांनी यात्रेचे वातावरण अधिकच भारावून टाकले आहे.
ही यात्रा म्हणजे केवळ बाजारपेठ नसून ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेतकऱ्यांचा सन्मान आणि स्वदेशी संस्कृतीचा गौरव आहे. शहरी पिढीला ग्रामीण जीवनाशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य भीमथडी यात्रा करत आहे.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेली ही यात्रा सुरक्षितता, स्वच्छता आणि नियोजनाच्या दृष्टीने आदर्श ठरत असून, पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कुटुंबासह भेट देण्यासाठी ही यात्रा एक उत्तम ठिकाण बनली आहे.
महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने भीमथडी यात्रेला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




