सातारा:-८५वा औंध संगीत महोत्सव शुभारंभ दि: ११ऑक्टोबर रोजी सकाळी….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
८५ वा औंध संगीत महोत्सव शुभारंभ दि: ११ऑक्टोबर रोजी सकाळी….

सातारा
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरा होणारा औंध संगीत महोत्सव यंदा८५व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा महोत्सव ऐतिहासिक औंध कला मंदिर, औंध, जिल्हा सातारा
येथे संपन्न होणार आहे.
सदर महोत्सवाचा उद्घाघाटन समारंभ शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी
सकाळी ८:४५ वा. श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राणीसाहेब, औंध. यांच्या हस्ते होत आहे.
प्रशासक / ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
संध्याकाळी ४.०० वाजता ‘रियाझ २०२५’ या स्मरणिकेचे प्रकाशन या महोत्सवाचे प्रमुख
अतिथी मा. ना. श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते व महा मेट्रोचे एम डी. मा. श्री. श्रावण हर्डीकर (मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.),सातारा जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील तसेच प्रशासक श्री. आय. ए. शेख व
ग्रामविकास अधिकारी श्री. सी. एन. काझी, ग्रामपंचायत औंध यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सर्व संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा
व या उत्सवाची शोभा वाढवावी. सर्वांना हार्दिक आग्रहाचे आमंत्रण.
निमंत्रक: संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मंडळ व सर्व पदाधिकारी यांनी पाठवले. अशी माहिती गायक अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संगीत महोत्सवात गायनातील पाचवी पिढी सक्रीय सहभाग घेणार आहे. औंध पंतप्रतिनिधी घराण्याने संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संगीत पर्यटन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने संगीत महोत्सव साजरा केला होता.




