लंडन:-डॉ.देवेंद्र साठे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान – फिजिओथेरपी व नॅचुरोपॅथी क्षेत्रातील कार्याची दखल; सन्मानार्थ डॉक्टरेट प्रदान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

डॉ.देवेंद्र साठे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान – फिजिओथेरपी व नॅचुरोपॅथी क्षेत्रातील कार्याची दखल; सन्मानार्थ डॉक्टरेट प्रदान.

लंडन, ५ एप्रिल २०२६ : फिजिओथेरपी आणि नॅचुरोपॅथी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. देवेंद्र साठे (पी. टी.) यांना लंडन स्कूल ऑफ बिझनेस अँड सायन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सन्मानार्थ डॉक्टरेट (Honoris Causa) प्रदान करण्यात आली आहे.
संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीच्या आधारे हा सन्मान जाहीर केला. डॉ. साठे यांनी संबंधित क्षेत्रात केलेले कार्य, समाजोपयोगी सेवा आणि व्यावसायिक योगदान याची दखल घेत हा किताब बहाल करण्यात आला आहे.
५ एप्रिल २०२६ रोजी हा सन्मान अधिकृतपणे प्रदान करण्यात आला असून प्रमाणपत्र क्रमांक 260452681 असा आहे.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. साठे म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात अधिक योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.”
डॉ. साठे यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




