कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचगणी:-विठ्ठलवाडी गाव टँकर मुक्त करण्याचा निर्धार – श्री स्वप्निलभाई गायकवाड

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विठ्ठलवाडी गाव टँकर मुक्त करण्याचा निर्धार – श्री स्वप्निलभाई गायकवाड

 सातारा प्रतिनिधी अनिल वाडकर

यशवंतनगर गणातील विठ्ठलवाडी गाव मागील अनेक दशकांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जाते. फेब्रुवारीपासून पावसाळा सुरू होईपर्यंत या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जवळपास ५०० ते ६०० लोकसंख्या असणारे हे पश्चिम भागातील पाचगणी व दांडेघरच्या पायथ्याला असणारे गाव आहे. मागील अनेक दशकांपासून गावातील पाणीपुरवठा योजना ही डोंगरातून ग्रॅव्हिटी द्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर चालते. यासाठी या गावातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी अथक प्रयत्न करून या पद्धतीची पाणीपुरवठा योजना उदयास आणली यामुळे वर्षातील ८ महिने या गावाला अगदी सुरळीत पाणीपुरवठा होत असतो. मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई होते. गावातील अनेक मंडळींनी मागील अनेक वर्षांमध्ये वर्षभर पुरवठा होईल अशा सुरळीत पाणीपुरवठा योजनेसाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या शेवटच्या चार महिन्यांमध्ये सुरळीत अशा पद्धतीची योजना अद्यापही उभी करण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले नाही. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये यशवंत नगर गणामध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या युवा नेतृत्व श्री स्वप्निल भाई गायकवाड यांनी विठ्ठलवाडीला टँकर मुक्त करण्याचा निर्धार केला गावातील लोकप्रतिनिधी व मान्यवर मंडळींना एकत्र करून यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने शासन दरबारी योग्य पद्धतीचा पाठपुरावा सुरू केला. त्याच अनुषंगाने आज सातारा जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्ष सौ प्रिया महेश शिंदे यांची भेट घेऊन यावर योग्य तोडगा काढण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये योग्य उपाययोजना राबवून विठ्ठलवाडी गाव हे टँकर मुक्त करावे यासाठी आपले सहकार्य लागेल या पद्धतीची मागणी सन्माननीय अध्यक्ष यांच्यासमोर स्वप्निल भाई व ग्रामस्थांनी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात येतील व लवकरात लवकर गावचा सर्वे करून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून योग्य आराखडा तयार करण्यात येईल व त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष यांनी दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्री पांडुरंग महादेव निकम, संदीप रघुनाथ रांजणे, लक्ष्मण रामचंद्र गोळे, प्रदीप संपत गोळे सरपंच, मंगेश गणपत निकम, सचिन नथू मांढरे व श्री अमोल आबा महांगडे उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button