ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-नांदल येथे गुलाब रोपांच्या विविध जातींचे कलम प्रात्यक्षिक.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

नांदल येथे गुलाब रोपांच्या विविध जातींचे कलम प्रात्यक्षिक.
मलटण :
फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय , फलटण यांच्यावतीने फलटण तालुक्यातील नांदल गावात कृषीदुतांकडून गुलाब रोपाचे विविध जातींचे कलम (टी-बडिंग) कसे करावे व त्याचे उत्पादन कसे घ्यावे याचे योग्य मार्गदर्शन स्थानिक शेतकऱ्यांना केले.
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत गुलाब शेती फायद्याची ठरते यासाठी गुलाब रोपांना विविध प्रकारे कलम करता येते याचे प्रात्यक्षिक नांदल येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून दाखवण्यात आले यावेळी गावचे नामांकित शेतकरी उपलब्ध होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. संजय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत युवराज काळे, धीरज कणसे, गणेश आवताडे, गणेश बोराटे, विवेक पाठक, ऋषिकेश चव्हाण, पृथ्वीराज बाबर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत या कृषीदुतांनी नांदल येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button