खटाव:-पडळ फाटा येथे डांबरी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
पडळ फाटा येथे डांबरी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी.
मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यातील मसवड मार्गे पंढरपूर जाणाऱ्या पडळ फाटा येथे डांबरी स्पीड ब्रेकर बसवावा आणि अपघात टाळावा. अशी मागणी कान्हरवाडी चे सरपंच चंद्रकांत यलमर यांनी केली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की मसवड मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या या रस्त्याला वडूज पडळ कलेढोण हा रस्ता दुभागून जातो. शिवाय या फाट्याजवळ खटाव – माण ऍग्रो प्रोसेसिंग हा साखर कारखाना असल्याने अनेक ऊस वाहतूकदार या मार्गाचा अवलंब करतात. सदर फाट्यावर अनेक वाहने दोन्ही बाजूकडून ये जा करतात त्यामुळे अपघात घडतात. तसेच या वर्षात वीस पेक्षा जास्त अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन विना विलंब स्पीड ब्रेकर बसवावा अशी मागणी ही त्यांनी केली.