आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-चोराडे येथील अंगणवाडीमध्ये पोषण आहार की मुलांच्या आरोग्याशी खेळ
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी :-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ब्रेकिंग न्यूज
पोषण आहार की मुलांच्या आरोग्याशी खेळ
चोराडे येथे अंगणवाडी शालेय पोषण आहारा मध्ये सापडले किडे , आळ्या.
चोराडे तालुका खटाव येथे दिनांक 4 रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे , अंगणवाडी मधील लहान मुलांच्या शालेय पोषण आहारा मध्ये लहान लहान किडे आणि अळ्या असल्याचे दिसून आले असुन, ह्या अत्यन्त लाजिरवण्या प्रकारा बाबत परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत . लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर येताना दिसत आहे चोराडे येथील अंगणवाडी क्रमांक 34 व 35 मध्ये हा प्रकार घडला असून पालक वर्ग संतप्त आहे , तरी या बाबत आता दोषींवर कार्यवाही होणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय.