चिपळूण पंढरपूर मार्ग अद्यापही दुर्लक्षित____प्रभाकर घार्गे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
चिपळूण पंढरपूर मार्ग अद्यापही दुर्लक्षित____प्रभाकर घार्गे.
मायणी प्रतिनिधी__चिपळूण मल्हार पेठ पंढरपूर हा मार्ग ब्रिटिश काळापासून असून हा मार्ग थेट पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी जातो अनेक भावी पायी चालत या मार्गाने जातात तसेच अनेक पालकया याही या मार्गाने प्रस्थान करतात परंतु हा मार्ग मायणी चोराडे शामगाव घाट मसूर उंब्रज या मार्गावर अनेक खड्डे पडले असून वाहन चालकांना कसरत करावी लागते तसेच रस्ता आहे की खड्डा असा प्रश्न वाहन चालकांना पडतो त्याचप्रमाणे कराड शिंगणापूर रस्ता पसे सावळी पासून पुढे या रस्त्याला अनेक खड्डे पडले आहेत तरी ही दोन रस्ते केंद्र शासनाने विना विलंब दुरुस्त करावेत तसेच बजेटमध्ये या रस्त्यावर खर्च करावा अशी मागणी खटाव माणचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केंद्र शासनाकडे केली सदरचा मार्ग हा पंढरपूरचा अत्यंत जवळचा असून मायणीपासून पुढे दोन पदरी झाला आहे मायणीपासून पश्चिमेकडे अत्यंत खराब आहे तसेच या मार्गावर पूर्वी पाटण पंढरपूर ही पाटण आगाराची एकच बस सेवा होती ही बस सेवा या आगाराने बंद केल्याने गोरगरीब जनतेला एसटी वाहतूक मिळत नाही तरी विभागीय नियंत्रक सातारा यांनी चिपळूण मल्हार पेठ पुसे सावळी मायणी दिघंची अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी ही माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केली आहे.