खटाव:-मायणी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त 25 रोजी बैलगाडा शर्यत.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त 25 रोजी बैलगाडा शर्यत.
मायणी प्रतिनिधी___मायणी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त तांत्रिक कारणाने रद्द झालेंली बैलगाडा शर्यत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली व माण खटाव चे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 रोजी सोमवारी संपन्न होणार आहे ही बैलगाडा शर्यत पारदर्शक होणार असून एकूण आलेल्या बैलगाडा प्रवेश फी च्या चिटया एकत्र करून सोडत पद्धतीने ही शर्यत संपन्न होणार आहे तसेच या शर्यतीचे पहिले बक्षीस एक लाख दुसरे बक्षीस 75000 तिसरे बक्षीस 51 हजार चौथे 3१एकतीस हजार पाचवे बक्षीस एकवीस हजार सहावे बक्षीस 11000 सातवे बक्षीस 7000 अशी भरघोस बक्षीस असून ही बैलगाडा शर्यत मायणी वडूज रोडवर संपन्न होणार आहे तरी बैलगाडा मालकांनी आपली बैलगाडी वेळेवर घेऊन यावे असे आवाहन राजाराम कचरे अभिजीत का बुगडे राजू ठोंबरे महादेव ढवळे संतोष ढवळे व जालिंदर माळी यांनी केले आहे.