नवी मुंबई:-रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने दिनांक 21/ 12 /23 रोजी एकतानगर नंबर 5 ग्रीन पार्क झोपडपट्टी सेक्टर 19 दाना मार्केट अपोजिट वाशी नवीमुंबई येथे दिनांक 16 डिसेंबर रोजी 10 झोपडीला आग लागून जळून खाक झाल्या होत्या तरी नवी मुंबई विकास आघाडी चे घटक आपणादल चे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र वर्मा जी यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्यावतीने दिनांक 20 डिसेंबर रोजी स्वयंपाकाला लागणारी भांडी वाटप करण्यात आली तसेच आज दिनांक 21 डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे अतिश्रम व शफिक सिद्दिकी यांच्याकडून झोपड्यावर टाकण्यासाठी पंधरा बाय वीस चा प्लास्टिक व रामआशिष जयस्वाल यांच्याकडून सहा झोपडीधारकांचे सर्व साहित्य जळून खाक झाले असल्याने एका परिवाराला दोन चादरी एक चटाई व एक कंबल याप्रमाणे सहा कुटुंबाला दुपारी दीडच्या सुमारास वाटप करण्यात आले त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दादा भालेराव, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, रिपब्लिकन सेना नवी मुंबई महिला सचिव शोभाताई इंगळे, रिपब्लिकन सेनेच्या झुंजार नेत्या व माजी महिला अध्यक्ष नवी मुंबई गजराताई इंकर व त्यांचे सहकारी एकता नगरच्या वस्ती मधून नूरजहाँ शेख,भारती शिर्के, सज्जाद पठाण, मेहबूब शेख, रामआशिष जयस्वाल त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहुल साहित्य वाटप करण्यास सहकार्य केले.