गंगापूर:-(शिल्लेगाव)- अबब…..चिकनच्या दुकानावर शिल्लेगाव पोलिसांचा छापा, तब्बल चार लाख रुपयांचा गुटखा व देशी विदेशी दारुवर कारवाई,…..
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
अबब…..चिकनच्या दुकानावर शिल्लेगाव पोलिसांचा छापा, तब्बल चार लाख रुपयांचा गुटखा व देशी विदेशी दारुवर कारवाई,…..
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पथकाची शिल्लेगाव पोलिसांची आतापर्यंत मोठी कारवाई……
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी देशी-विदेशी दारू व गुटख्यावर आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली असून छत्रपती संभाजी नगर नाशिक महामार्गावरील पाचपीरवाडी येथे चिकनच्या दुकानामागे असलेल्या गोडाऊनमध्ये अवैधपणे साठवून ठेवलेला देशी-विदेशी दारू व गुटखावर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे
दरम्यान पाचपीरवाडी येथील प्रतापसिंग बहुरे (वय -50 वर्ष) यांच्या गोडाऊनमध्ये विदेशी दारूचे 22 बॉक्स व ,देशी दारूचे 12 बॉक्स तर बियरचे 10 बॉक्स जप्त केले असून या छाप्यामध्ये हिरा, गोवा, राजनिवास गुटख्याचाही समावेश आहेत या मुद्देमालाची किंमत अंदाजे चार लाख रुपयांच्या आसपास असल्याचे समजते दरम्यान सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, बिट अमलदार तात्याराव बेदरे, ,राजेंद्र निसर्गे,,आदींनी कारवाई केली आहे.
पाचपीरवाडी फाटा परिसरात अवैध दारू विक्री सह चालणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार ग्रामसभेत व मासिक सभेत ठराव घेऊन संबंधित पोलीस स्टेशन मा.आयुक्त राज्य उत्पादक शुल्क विभाग छ.संभाजीनगर यांना दिले २३जुलै रोजी माननीय आयुक्त राज्य उत्पादक शुल्क छ.स.व
मा.खासदार संदिपान भुमरे छत्रपती संभाजी नगर
या.आमदार प्रशांत बंब गंगापुर जि.छ.संभाजीनगर यांना अंबरसिंग जंघाळे व गावकऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदन व अमरण उपोषणाच्या इशाऱ्याने हे कारवाई झाल्याची नागरिकात चर्चा.