सातारा:-नूतन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जिंकले पत्रकारांचे सर्वांचे मन.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
नूतन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जिंकले पत्रकारांचे सर्वांचे मन.
सातारा दि: बदली ही प्रशासनातील प्रक्रिया आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्या बदली संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जातात. परंतु, त्याला बगल देऊन विकासात्मक व रचनात्मक कार्याला प्राधान्य देण्याची घोषणा नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केली.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांची तातडीने बदली झाली.त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला नसताना ही त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र दुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम दैनिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट देऊन शुभारंभ केला. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील नियोजन भवनात पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तर दिली.
जिल्ह्याच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना अधिक गतिमान करणे. तसेच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. महाबळेश्वर पाचगणी येथील आराखडा पुन्हा एकदा तपासून पर्यटन स्थळ वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेऊन जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा अशा दृष्टीने कामकाज करताना सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल .असे त्यांनी स्पष्ट केले. फलटण निरा तरडगाव बरं या सर्व भागातील पालखी स्थळाची त्यांनी पाहणी केली. यावेळेला दिव्यांग व्यक्तींचे प्रश्नाला त्यांनी स्पर्श केला. आगामी सहा महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील विकास काम अधिक गतीने व्हावी. यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळेला सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
सातारा येथे नूतन जिल्हाधिकारी यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत अनेक मान्यवरांनी जिल्हा नियोजन भवनात गर्दी केली होती. या गर्दीमुळे अभ्यासू व जाणकार पत्रकारांना काही मुद्द्यांना स्पर्श करून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत माहिती द्यायची होती .परंतु, वेळेअभावी चांगल्या व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेला फारसा वाव मिळाला नाही .त्यामुळे अधिकृत पत्रकारांची यादी जिल्हाधिकारी यांनी द्यावी अशी मागणी करण्यात आली .त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी फोटोसेशन केले.
फोटो ___सातारचे नृत्य जिल्हाधिकारी यांच्याकडे महत्त्वाच्या कामकाजाबाबतच्या बातमी दाखवली म . यावेळी त्यांनी संबंधित नायब तहसीलदाराचे कौतुक केले. (छाया – सूरज पोतदार, सातारा )