लोहगाव:-जैविक नियंत्रण केंद्राच्या शास्त्रज्ञांचा लखनऊ येथे सातव्या आंतरराष्ट्रीय ऊस व साखर परिषदेमध्ये उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव( वार्ताहर) येथील भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ आणि साखर संशोधन व प्रचाराची आंतरराष्ट्रीय सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने ऊस व साखरेच्या एकात्मिक उद्योगाचे शाश्वत करिता ७ वी आंतरराष्ट्रीय ऊस व साखर परिषद, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे नुकतीच पार पडली. या परिषदमध्ये आपले देशातील ऊस व साखरेवर संशोधन करणाऱ्या संस्थेतील शास्त्रज्ञ तसेच जगभरातील ऊस उत्पादक दहा देशांतील असे मिळून जवळपास ३५० हून अधिक शास्त्रज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते व वेगवेगळ्या विषयातील ऊसावरील शोधनिबंध व शोधपत्रे सादर करण्यात आली होती. या परिषदेमध्ये प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित राहून महाराष्ट्रातील ऊसावरील संशोधन कार्याचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये शास्त्रज्ञ व केंद्राचे प्रभारी डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी महाराष्ट्रातील उसावरचा पोक्का बोएंगशी संबंधित फ्युसेरियम नावाच्या बुरशिजन्य रोगाची ओळख, त्याच्या उपप्रजाती आणि रोग प्रसार या संदर्भात शोधपत्र सादर केले. तसेच डॉ. बोरसे यांनी उष्णकटिबंधीय परिस्थितीमध्ये ऊस तोडणीनंतर ऊसातील रसामध्ये होणारे जैवरासायनिक बदल यावरही शोधपत्रे परिषदेमध्ये सादर करण्यात आले. केंद्रामधील दुसरे शास्त्रज्ञ डॉ. योगेश एकनाथराव थोरात यांनी ऊसावरील हुमणी किडीच्या नियोजनासाठी जमिनीमधील मित्र सूत्रकृमींचा वापर यावर शोधनिबंध परिषदेमध्ये सादर करण्यात आला. प्रवरानगर केंद्रातील शास्त्रज्ञाद्वारा सादर करण्यात आलेले हे शोध निबंध व संशोधन कार्ये हे महाराष्ट्रातील ऊस पिकांवरील सध्याचे परिस्थितील नाविन्यपूर्ण संशोधन असून याचा लाभ ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला होणार आहे. याच अनुषंगाने या केंद्रातील शास्त्रज्ञांचा त्याच्या शोधनिबंध सादरीकारणांसाठी व दोन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याबद्दल लखनौ येथील ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय ऊस संशोधन संस्था लखनौचे संचालक डॉ. ए. डी. पाठक यांनी डॉ. बोरसे व डॉ. थोरात यांनी केलेल्या उत्कृष्ट संशोधन कार्याचे कौतुक केले तसेच प्रवरानगर केंद्रात सुरू असलेल्या संशोधन कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.