ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-गिरिस्थान नगर परिषदेच्या नुतन मुख्याधिकारी पदी श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांनी स्वीकारला पदभार.

पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

महाबळेश्वर च्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली झाली असून गिरिस्थान नगर परिषदेच्या नुतन मुख्याधिकारी पदी श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी नुतन मुख्याधिकारी योगेश बाळकृष्ण पाटील यांचा महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली ताई कुमार शिंदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकारी साहेबांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक कुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष युसूफ भाई शेख उपस्थित होते. तसेच महाबळेश्वर शिवसेना शहर च्या वतीने नुतन मुख्याधिकारी पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू, शिवसेना शहर संघटक सुनील ढेबे, उपशहर प्रमुख सचिन गुजर, व शिवसैनिक , उपस्थित होते. याप्रसंगी महाबळेश्वरातील विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी पाटील साहेबांनी महाबळेश्वर शहरात आरोग्य स्वच्छता व महाबळेश्वर विकासाच्या संदर्भात तसेच महाबळेश्वरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे .असे प्रतिपादन केले याप्रसंगी मुख्याधिकारी साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button