आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-शुक्रवार पेठ तालीम गणेशउत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मा.नगरसेवक फिरोज आतारच !

सह - संपादक -अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक -अशितोष चव्हाण
शुक्रवार पेठ तालीम गणेशउत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मा.नगरसेवक फिरोज आतारच !

फलटण
अखंड फलटणकरांच्या नजरा लागून राहिलेल्या मानाच्या पहिला व नवसाला पावणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या अध्यक्ष पदावरती मा.नगरसेवक फिरोज आतार यांची बिनविरोध व फेर निवड करण्यात आली .या मनाच्या व नवसालाव पावणाऱ्या महागणपतीच्या मंडळाची मीटिंग रामेश्वर गणपती मंदिरात दिनांक 21/8/2023रोजी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या विविध पदाच्या निवडीबाबत कार्यकर्त्याची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मागिल वर्षाच्या ताळेबंद मागील वर्षाचे खजिनदार बाळासाहेब भट्टड यांनी सादर केला. यानंतर यावर्षीच्या मंडळाच्या विविध पदासाठी निवडीची सूचना निलेश खानविलकर यांनी मांडली ,याचे अनुमोदन श्रीनाथ नलवडे व निलेश चिंचकर यांनी दिले. या बैठकीचे अध्यक्ष प्रीतम बेंद्रे यांनी सूचनेस मान्यता दिली.

यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना नावे देण्याची सूचना बैठकीचे अध्यक्ष प्रीतम बेंद्रे यांनी केली असता अध्यक्ष पदासाठी फक्त फिरोज आतर हे एकच नाव घेण्यात आले. तर तीन उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र कर्वे, सुमित मठपती, साजिद डांगे, तीन सेक्रेटरी पदासाठी सौरभ सुतार,प्रमोद देशपांडे, प्रणव डहाळे व दोन खजिनदार पदासाठी बाळासाहेब भट्टड व श्रीनाथ नलवडे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. फलटण शहरातील सर्वात जुन्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या व फलटण मधील सर्वात मोठी गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष पदी पुन्हा एकदा फिरोज आतर यांची बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button