आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-14 सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मा.मदनदादा भोसले यांच्या हस्ते संपन्न.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि .14
सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मा.मदनदादा भोसले यांच्या हस्ते संपन्न.

वाई येथील किसन वीर महाविद्यालयामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.मदनदादा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्रा. रमेश डुबल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, प्रकल्प कॉन्ट्रॅक्टर टेक डिझायर सोलर सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड,पुणे येथील संचालक श्री. गिरीश निगडे उपस्थित होते. या वेळी बोलताना दादा म्हणाले की,” सौरऊर्जा हा प्रकल्प पर्यावरण पूरक असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यात उपयुक्त ठरेल. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे महाविद्यालयातील विजेची समस्या दूर होणार असून; नैसर्गिक स्त्रोतातून वीज निर्मिती केल्याने महाविद्यालयास आर्थिक फायदा होणार आहे.
अत्यंत कमी वेळेत हा प्रकल्प कार्यान्वयीत केल्याने मा.दादांच्या हस्ते श्री गिरीश निगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, “या प्रकल्पामुळे महाविद्यालयांमधील विजेची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून, मा.दादांनी जातीने लक्ष देऊन, अत्यंत जलद गतीने हा प्रकल्प पूर्ण केला, त्यामुळे त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. तसेच श्री. गिरीश निगडे यांनी कमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केल्याने त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शिक्षक प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button