आकुर्डी:-मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या पाठपुराव्याने आकुर्डी चौकातील दिशादर्शक फलक दुरूस्त.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या पाठपुराव्याने
आकुर्डी चौकातील दिशादर्शक फलक दुरूस्त.
आकुर्डी, दि. 25 (शफिक शेख):- खंडोबा माळ चौकातील (आकुर्डी) मुंबई-पुणे महामार्गावरील दिशादर्शक फलक हा मागील अनेक महिन्यांपासून तुटून पडलेला होता. नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनातर्फे त्याची दखल घेतली जात नव्हती. वाहनचालकांना आणि नागरिकांना याचा खूप त्रास होत होता. याची दखल मा. नगरसेवक सचिन चिखले यांनी घेतली आणि प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांना धारेवर धरत अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला.
या सततच्या पाठपुराव्याला आणि चिखले यांच्या प्रशासकीय वजनामुळे संबंधित विभागाने सदर आकुर्डी चौकातील दिशादर्शक फलक दुरूस्त केला. चिखले यांच्या या कारवाईमुळे आकुर्डी परिसरातील नागरिकांनी त्यांचे खूप आभार मानले.