कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने ज्योतिर्मय महोत्सव यशस्वी ठरला- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने ज्योतिर्मय महोत्सव यशस्वी ठरला- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.

सातारा दि: महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ज्योतिर्मय फाऊंडेशनने अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वासार्हता जपले आहे. त्यामुळेच गेले अनेक वर्ष ज्योतिर्मय महोत्सव यशस्वी ठरला आहे .ग्राहकांची पसंती निर्माण झालेली आहे. असा सार्थ विश्वास सातारा जावलीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये उभारण्यात आलेल्या ज्योतिर्मय महोत्सव २०२३ उद्घाघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुवर्णताई पाटील ,शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव ,भाजपचे सुनील काटकर, अविनाश कदम, नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी मनीष महाडवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्राधान्य देऊन या ठिकाणी २०० स्टॉल उभारण्यात आलेले आहेत .खवय्यापासून खाद्यपदार्थ पापड ,चटणी, लोणचे, बेडशीट, स्वेटर ,संसार उपयोगी वस्तू, खेळणी , मनोरंजन अशा सर्व व्हरायटी असलेल्या या स्टॉलमुळे एकाच जागी मापक दरात वस्तू उपलब्ध होत आहे. त्यामुळे याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. असेही श्री भोसले
ज्योतिर्मय फाउंडेशन अध्यक्ष सौ सुवर्णाताई पाटील म्हणाल्या ,गेल्या दहा वर्षापासून नियमितपणाने महिला सबलीकरणाच्या निमित्ताने हा महोत्सव आयोजित केलेला आहे. ग्रामीण भागातील महिलांना मोफत स्टॉल दिले. त्यामुळे आता त्या स्वकर्तबदारीवर पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन दर्जेदार व गुणवान गुणात्मक उत्पादन केलेला पदार्थ वस्तू विक्री करीत आहेत.याचा मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण व संस्कार, संसार योग्यरीत्या हाताळत आहेत. वास्तविक आपण लावलेल्या रोपट्याला चांगली फळ आलेले आहेत. याचा मनस्वी आनंद होत आहे. याचबरोबर ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने महिलांना सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. आज या ठिकाणी संसार उपयोगी वस्तूंची खरेदी विक्री होते. त्याचबरोबर मनोरंनाबरोबरच सुर संगम सारखे संगीतमय कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने थंडीच्या दिवसात चांगली संगीत मय ऊब मिळत आहे .असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सातारा शहरा सोबतच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, वाई, जावळी, कराड, महाबळेश्वर, पाटण, खंडाळा, माण ,कराड व सातारा परिसरातील ग्राहक वर्गाने उपस्थित राहून या महोत्सवाचे कौतुक केले यावेळी रीना जावळे, सौ. कल्पना जगताप,फिरोज पठाण, ॲड. विक्रम पवार,सौ. सुनिशा शहा,वैष्णवी कदम, व इतर भाजपा व फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सौ.निर्मला पाटील,सौ.स्मिता शिंगटे,सौ.सीमा भाटिया,सौ.राधिका पाटील,सौ रीना भणगे,सौ.राजश्री दोषी, सईदा नदाफ,अंजुम मनेर,मल्लिका पुजारी,रेणुका शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

————————————–*———
फोटो -ज्योतिर्मय महोत्सवाच्या प्रसंगी आमदार सुरेंद्र सेहराजे भोसले सौ सुवर्णाताई पाटील व मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button