कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खंडाळा:-खंडाळा MIDC मध्ये रिएटर इंडिया कंपनी मधील 348 कामगार संपावर.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रिएटर कंपनीच्या कामगारांचा मंत्रालयावर लाँगमार्चचा इशारा.

सेक्रेटरी योगेश खामकर, श्रमिक महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी आणि सल्लागार मारुती जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी सर्वप्रथम कामगारांवर अन्याय करणारे कावेबाज कंपनी प्रशासन व त्यांना साथ देणाऱ्या कंपनी धार्जीण्या लोकप्रतिनिधींचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना योगेश खामकर यांनी कंपनीमार्फत कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचून दाखविला. कंपनी परिसरात अगदी सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये ही कंपनी बनवेगिरी करीत असून सर्वच कामगार जीव मुठीत धरून काम करीत असून कामगारांची सुरक्षितता व आरोग्य धोक्यात असल्याचे सांगितले. जाणीवपूर्वक फेडरेशनच्या सहा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण व डेप्यूटेशनच्या नावाखाली परराज्यात पाठवून संघटनेत फूट पाडण्याचा केविलवाना प्रयत्न कंपनी करत असल्याचा आरोप खामकर यांनी केला आहे. चौकशीच्या नावाखाली जवळजवळ २३ कामगारांना निलंबित केले असून त्यांची चौकशी चालू केली आहे. ११ कामगारांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पर राज्यात पाठवले आहे. फेडरेशनच्या पदाधिकारी व सभासद कामगारांशी कंपनी सूडबुध्दीने वागत आहे. केवळ रिएटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन बरखास्त करण्याच्या उद्देशाने कामगारांवर कंपनीकडून दडपशाही व अन्याय होत आहे. इतके सगळे होत असताना स्थानिक पदाधिकारी केवळ कंपनीत कामाला असणारे आपल्या मुलाबाळांच्या व बगलबच्चांच्या नोकऱ्या व त्यांना मिळणारी कंत्राटी टिकवण्यासाठी, सीएसआर फंडाच्या ओझ्या खाली दबत कंपनीचे समर्थन करून कामगारांना वाऱ्यावर सोडत असले बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अंतिम विजयापर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार असल्याचे सांगितले. श्रमिक महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी त्यांचे वर जिल्हा बाह्य हस्तक्षेपाबाबत होत असलेल्या आरोपाची सुरुवातीसच हवा काढून घेतली. ते स्वतः सातारा जिल्ह्यातील कायम रहिवासी असल्याचे सांगत स्थानिकांनीच कष्टकरी कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने आम्हाला हस्तक्षेप करावा लागत असल्याने बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपाची वेळ का येते ? याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी खंडाळ्यातील कंपनीला समर्थन देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना दिला. हजारोंच्या संख्येने पर राज्यातील कामगार गलेलट्ट पगारावर काम करीत असताना खंडाळा तालुक्यातील केवळ २० च्या आसपासच कामगार कायमस्वरूपी असल्याचे बाब त्यांनी आवर्जून निदर्शनास आणून दिली कंपनीला राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना ही राजकीय पक्षाची युनियन चालते मात्र कष्टकऱ्यांची एकता मजबूत ठेवणाऱ्या श्रमिक एकता महासंघाचे कंपनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांना ऍलर्जी का असा सवालही त्यांनी केला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button