क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-आंतरराष्ट्रीय वाहन चोरांची टोळी जेरबंद केल्याबद्दल रिपब्लिकन ( ए गट) वतीने सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

आंतरराष्ट्रीय वाहन चोरांची टोळी जेरबंद केल्याबद्दल रिपब्लिकन ( ए गट) वतीने सत्कार.

सातारा दि: सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाहन चोरी करणारी आंतरराज्य टोळीला जेरबंद केली. या कारवाईत सुमारे सव्वा कोटी रुपयांचे वाहने ताब्यात घेऊन सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याबद्दल सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा रिपब्लिकन पक्षाच्या (ए गट)च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की ,सातारा जिल्हा स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे, उपनिरीक्षक अमित पाटील व विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील तीन पथकाने चोरीतील वाहने जप्त केली. सदर गुन्हे सातारा, रायगड व सोलापूर जिल्ह्यात वाहनांची विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर ही मोठी वाहन चोरीची टोळी हाती आली. याबद्दल रिपाई (आंबेडकर ए गटाचे) खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे, गटनेते अतुल दादा घोणे, मराठा आघाडी तालुकाध्यक्ष हेमंत गोडसे तालुका सल्लागार विजय यादव, संघटक अमोल पोळ रोहित मोरे व मान्यवरांनी स पो नि अरुण देवकर यांची भेट घेऊन त्यांचा जाहिर सत्कार केला. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी रिपाईचे कार्यकर्ते नेहमीच सहकार्य करत असून या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील वाहन चोरीचे अजून गुन्हे लवकरच उघडकीस येणार आहेत.
आदरणीय सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली ही चोरी उघडकीस आल्यामुळे वाहन चोरीस गेलेल्या चालकांना दिलासा मिळणार आहे. न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची वाहने त्यांना ताब्यात मिळणार आहेत. या कारवाईमध्ये आरोपींची कसून चौकशी होत असून कोणताही राजकीय अथवा कुठलाही दबाव न घेता निपक्षपातीपणाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या कामगिरी बद्दल सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेषता रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर ए गट) यांनी पोलीस दलाचे स्वागत व सत्कार करून त्यांना विशेष पोलीस पदक द्यावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहमंत्री तथा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
————————————————————–
फोटो- सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करताना रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष सागर भिलारे व मान्यवर ( छाया-
सूरज पोतदार, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button