शिर्डी:-जपानी महिला साई भक्ताचे सव्वा लाख रुपये शिर्डीत चोरले …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
जपानी महिला साई भक्ताचे सव्वा लाख रुपये शिर्डीत चोरले …..
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) शिर्डी – श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री . साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका जपानी महिलेचे सव्वा लाख रुपये चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की . या जपानी साईभक्त महिलेने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर द्वारकामाई परिसरात काही वस्तु खरेदी करत असताना या माहिलेची सव्वा लाखाचा ऐवज असेलेली पर्स चोरट्याने चोरून नेली . याबाबत या महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संभाजी पाटील हे करीत आहेत
या घटनेमुळे साई भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत साईबाबा मंदिर सुरक्षा व्यवस्थेला धारेवर धरले आहे .