आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी जगाशी जोडला जाईल – मा.कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी जगाशी जोडला जाईल – मा.कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के

संस्थेच्या हीरकमहोत्सवानिमित्त गुंफले चौथे पुष्प.

वाई: दि. २८ नोव्हेंबर २०२६
नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे, ज्ञान हे मूळचेच आहे ते केवळ सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याची भीती न बाळगता या धोरणाला सकारात्मकतेने सामोरे गेले पाहिजे. या धोरणाला देशाच्या सीमा नसून, त्यामध्ये जगाशी जोडणारे ज्ञान आहे, असे प्रतिपादन सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील विशेष व्याख्यानाचे चौथे पुष्प गुंफताना ते नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, मोहनआबा भोसले तसेच संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले, माणूस म्हणून आपल्या सर्वांचा डीएनए एकच आहे. नवीन शैक्षणिक धोरणात ज्ञानाची निर्मितीप्रक्रिया समान आहे. हे धोरण भारतीय शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे महत्त्वाचे धोरण आहे. या धोरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. यात संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय शिक्षणाचा जागतिक स्तरावर विकास करणे याला महत्त्वाचे स्थान आहे. सदर धोरणामुळे माणूस आंतरबाह्य ओळखता येतो. पैठण, काशी या ज्ञानकेंद्रीय नगरांबरोबरच वाई हे ज्ञानाचे अधिष्ठान असणारे महान ठिकाण आहे. वाईमध्ये विश्वकोश निर्मिती बरोबर प्राज्ञ पाठशाळा मंडळाचे शैक्षणिक व धर्मकोश निर्मितीचे मोठे योगदान आहे. आपल्या देशात तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यामुळे पुढे अनेक विचारवंत समाज सुधारक व स्वातंत्र्यसैनिक निर्माण झाले. महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये समाज सुधारणेचा विचार व स्वातंत्र्यचळवळ वृद्धिंगत होत गेली. त्यामुळेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे स्वातंत्र्य सेनानी व राजाराम मोहन रॉय यांच्यासारखे समाजसुधारक यांनी केलेले कार्य हे जगाने नोंद घेण्यासारखे आहे. आजचा विद्यार्थी केवळ आपल्या देशापुरता मर्यादित न राहता त्याचा जगाशी संबंध आला पाहिजे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची भीती न बाळगता बहुभाषिक बनले पाहिजे. विज्ञानाची कास धरून मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. प्रत्येक कृतीमागे विज्ञान असून, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले म्हणाले, आज पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असल्याने पावसाचे प्रमाण फार कमी झाले आहे. पर्यावरण संवर्धन व जैवविविधता टिकवणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही छोट्या गोष्टीतूनच होत असते शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयातील इंग्रजीचे ख्यातनाम प्राध्यापक यशवंत कळमकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. रमेश डुबल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर यांनी आभार मानले. रेश्माबानो मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

**************चौकट***************
*मदनदादा भोसले यांचे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन*
पर्यावरण विषयावर बोलताना दादा म्हणाले, आजचे आपले सन्माननीय पाहुणे कुलगुरू डॉ. म्हस्के साहेब हे पर्यावरणाचे अभ्यासक आहेत. त्यांना मी असे आवाहन करतो की, ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू असल्याने, त्यांनी त्यांच्या संस्थेच्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक आंब्याचे रोप देऊन त्याचे संगोपन करण्यास सांगावे. व पहिली चार वर्षे त्याचे पर्यवेक्षण करावे, म्हणजे झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचे रक्षण होईल.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button