मुंबई:-भाजपच्या ‘सेवा दूत अभियानांतर्गत’ रविंद्र लाहोटी व फत्तेसिंह पाटणकर यांच्यावर माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-भाजपच्या ‘सेवा दूत अभियानांतर्गत’ रविंद्र लाहोटी व फत्तेसिंह पाटणकर यांच्यावर माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी.

पाटणमधील दोन पदाधिकाऱ्यांची सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात २५ दिवस सेवा.

मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ‘सेवा दूत अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे पदाधिकारी स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ दिवस राहून पक्षाचे विविध संघटनात्मक व सेवाभावी उपक्रम राबविणार आहेत.
या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजप किसान मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख श्री. रविंद्र लाहोटी आणि प्रज्ञा आघाडीचे जिल्हा संयोजक श्री. फत्तेसिंह पाटणकर यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून माढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन पक्षाचे संघटनात्मक कार्य, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, स्थानिक नागरिकांशी संवाद साधणे तसेच पक्षाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे काम हे दोन्ही पदाधिकारी करणार आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मिळाल्याने पक्ष संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष ना. श्री. रविंद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, बांधकाम मंत्री ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार श्री. मनोज घोरपडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ, खनिज विकास महामंडळाचे संचालक श्री. भरत पाटील (नाना) आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक श्री. सुनील तात्या काटकर, सत्यजित पाटणकर,याज्ञ्सेन पाटणकर यांचे रविंद्र लाहोटी व फत्तेसिंह पाटणकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत माढा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेच्या माध्यमातून सेवा दूत अभियान यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



