ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-खारघर सेक्टर २६ ते ३६ या परिसरातील पथदिवे दुरुस्ती करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे खारघर प्रभाग अधिकारी माननीय श्री. जितेंद्र मढवी यांना शिवसेनेकडूनकडून पत्र.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

आज खारघर सेक्टर २६ ते ३६ या परिसरातील पथदिवे दुरुस्ती करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे खारघर प्रभाग अधिकारी माननीय श्री. जितेंद्र मढवी यांना शिवसेनेकडूनकडून पत्र देण्यात आले.

खारघर सेक्टर २६ ते ३६ या विभागातील खूप पथदिवे खराब झालेले असून त्यामुळे रात्री या परिसरातील संपूर्ण रस्त्यांवर अंधार असतो. परिणामी या रस्त्यांवरून रात्री येऊ-जाऊ करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो. रात्री रस्त्यांवर अंधार असल्यामुळे लोक पडून त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. तसेच रात्री रस्त्यांवर अंधार असल्यामुळे चोरी व इतर गुन्हे होण्याची शक्यताही आहे.

पथादिवे सकाळी सहा वाजता बंद केले जातात परंतु त्यानंतरही रस्त्यांवर अंधार असतो आणि त्यामुळे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो. त्यामुळे हे पथदिवे सकाळी सहा वाजता बंद न करता सकाळी सात वाजेपर्यंत किंवा उजेड पडेपर्यंत चालू ठेवणे गरजेचे आहे.

या समस्यांचे निवारण करण्यासाठी आज शिवसेनेचे पनवेल शहर संघटक श्री मंगेश रानवडे, खारघर शहर संघटक श्री इम्तियाज शेख, विभाग संघटिका सौ ज्योती नाडकर्णी, विभाग प्रमुख श्री. मुनाफ अमीराली यांनी पनवेल महानगरपालिकेचे खारघर प्रभाग अधिकारी श्री. जितेंद्र मढवी यांची भेट घेऊन या समस्येचे लवकरात लवकर निवारण करावे यासाठी पत्र दिले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button