मायणी नगरीत महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी नगरीत महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न. मायणी प्रतिनिधी__हर हर महादेव बम बम भोले नाथ जय काशी विश्वेश्वर जय संगमेश्वर या जयघोषित मायणी या संतांच्या भूमीत महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली चांद नदीच्या तीरावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात पहाटेपासून भक्तांची रांग लागली होती पहाटे विधीवत अभिषेक अभिषेक संपन्न झाल्यानंतर महादेव मंदिर दर्शनासाठी खुले झाले सहा महिन्याच्या बालकापासून 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले येथील मुनी महाराज मठामध्ये सुद्धा प्रभू लिंग शिवाचार्य गंगाधर महाराज यांच्या हस्ते महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर अनेक भक्त आणि महादेवाचे दर्शन घेतले त्यानंतर महाराजांनी शिवमहात्म्य याविषयी आपले विचार व्यक्त केले आज दिवसभर मायणी परिसर शिवमय झाला होता महादेव मंदिरातील पुजारी बाबा पाटोळे यांनी चोख व्यवस्था केलेली होती