कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्ताने शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्ताने शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
आज आमच्या आश्रमशाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व गुरुजनांचा डायरी, पेन व गुलाबपुष्प देवून सत्कार केला.
उपशिक्षक श्री. रवींद्रनाथ मोहिते सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. आपल्या जीवनात असणारे शिक्षकांचे महत्व सांगीतले.
उपशिक्षक श्री. सूर्यकांत गेजगे सरांनी महाभारतातील काही गोष्टी सांगून गुरूचे महत्व पटवून दिले.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जसा शिक्षक असतो तसाच विद्यार्थी घडतो असे सांगून नवी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य शिक्षक करत असल्याने तो समाजातील सर्वात नशीबवान घटक आहे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या जीवनात आई वडीलांइतकेच महत्व शिक्षकांना आहे. सर्वांनी आपल्या गुरूप्रती नित्य आदर बाळगला पाहिजे. गुरू हा आपली दुसरी माता आहे त्यामुळे शिक्षकांचे समाजात स्थान उच्च आहे असे सांगितले.
यावेळी विद्यार्थी शिक्षक मनोगत कु. सदिया मुल्ला आणि प्रथमेश शिंदे यांनी केले. त्यांनी आजचा अनुभव सांगितला.
विद्यार्थी मनोगत कु. प्रणिता शिंदे हीने केले.
आजचे संपूर्ण दिवसाचे शालेय कामकाज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ आयोजित करून कार्यक्रमात उत्साह आणला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजची माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी मुख्याध्यापक कु. राधिका पवार हिने केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा दंडीले हिने केले. आभार कु. पूजा मोरे हिने मानले.