छ.संभाजीनगर:-सफारी पार्कच्या बाजूला उभे राहणार आता टायगर पार्क.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर
छ. संभाजीनगर:-स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून मिटमिट येथे शंभर हेक्टर जागेवर सफारी पार्क बनविण्यात येत आहे. सफारी पार्कला लागूनच टायगर पार्क साठी जागा मिळावी यासाठी महानगरपालिके कडून सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार महापालिकेला टायगर पार्क साठी 17 हेक्टर जागा मिळणार आहे या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ उद्यानावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यामुळे काही काळासाठी प्राणिसंग्रहालयाची परवानगी नाकारण्यात आली होती त्यामुळे प्राणी संग्रहालय हे मिटमिटा भागात स्थलांतरित करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत काम हाती घेतले होते. या प्रकल्पावर जवळपास 250 कोटी खर्च करण्यात येणार आहे सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून काही दिवसापूर्वी प्रकल्पावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती एप्रोच रोड ही प्रश्न सोडवण्यात आला होता सफारी पार्क साठी अग्निशामक विभागाने नुकतीच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे डिसेंबर 24 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता पाणीपुरवठा ड्रेनेज इलेक्ट्रिक वर्क अग्निशमन यंत्रणा सर्विस रोड जलकुंभ व वापरलेल्या पाण्याचा पुनर उपयोग करणारा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गती येणार आहे अंतर्मन सफारी पार्क च्या शेजारीच टायगर पार्क साठी जागा मिळावी यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता जिल्हा प्रशासनातर्फे 17 हेक्टर जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सूत्रांकडून माहिती मिळाली.