कराड:-कराडमध्ये प्रथमच दिनांक 20 रोजी बाल मधुमेहासाठी कार्यशाळेचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
कराड:-कराडमध्ये प्रथमच दिनांक 20 रोजी बाल मधुमेहासाठी कार्यशाळेचे आयोजन.
प्रतिनिधी__कराड येथील मधुमित्र ऍडव्हान्स डायबिटीस क्लिनिक यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 20 रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत एस एम एस इंग्लिश मीडियम स्कूलच्या हॉलमध्ये बाल मधुमेहासाठी निशुल्क कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती मधुमेह तज्ञ डॉक्टर गौरी ताम्हणकर यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सध्या भारतात मधुमेह प्रचंड गतीने वाढतो आहे. चार पैकी एका रुग्णाला मधुमेह झालेला आहे कडक उपायोजना, व्यायाम आणि आहार यांचे संतुलन ठेवले तर मधुमेह रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो तसेच सध्या फास्ट फूड व धगधगीचे जीवन यामुळे छोट्या बालकांना देखील टाईप वन मधुमेह होत आहे अशा बालकांसाठी पुणे येथील आहार पुणे येथील मधुमेह तज्ञ डॉक्टर याज्ञिक सर व त्यांची पूर्ण टीम, आहार तज्ञ ,मानसशास्त्रज्ञ तसेच बालरोग तज्ञ उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेची पूर्व नोंदणी 15 ऑगस्ट पर्यंत असून पालकांनी आपल्या पाल्यांना वेळेवर घेऊन उपस्थित राहावे व या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर गौरी ताम्हणकर यांनी केले आहे.