सातारा:-ज्येष्ठ पत्रकार मा.प्रा.दिलीप पुस्तके सर यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि मा.सौ.सुप्रिया पाटसुपे ताई यांची महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदावर निवड.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
सातारा:-ज्येष्ठ पत्रकार मा.प्रा.दिलीप पुस्तके सर यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि मा.सौ.सुप्रिया पाटसुपे ताई यांची महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदावर निवड.
दि- 19
सातारा:-ज्येष्ठ पत्रकार मा.प्रा.दिलीप पुस्तके सर यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि मा. सौ.सुप्रिया पाटसुपे ताई यांची महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदावर राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब आणि Adv. आतिश इनामदार यांच्या हस्ते नियुक्त पत्र आणि ओळखपत्र देऊन दि.19/11/2023 रोजी निवड करण्यात आली.
माननीय श्री प्राध्यापक दिलीप पुस्तके सर यांचे पत्रकार क्षेत्रामधील असलेला प्रचंड अनुभव शैक्षणिक राजकीय क्रीडा अशा अनेकविध क्षेत्रावर ती केलेले उल्लेखनीय लेखन तसेच जूनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सरांनी केलेले पाहाव्यास मिळते. तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये पीएचडी प्राप्त पुस्तके सर त्यांच्याबद्दल किती लिहावे तेवढे कमीच आहे. आम्हाला गुरुच्या स्थानी असलेले पुस्तके सर यांची निवड ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION / “RPS STAR NEWS” / आणि “ACLS जनता की आवाज” च्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदाची सूत्र स्वीकारून समाजात घडत असलेले अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याविरुद्ध फक्त पत्रकार म्हणून नाही तर एक जागृत पत्रकार म्हणून कार्यभार सांभाळण्याचे आश्वासन मा. प्रा. दिलीप पुस्तके सर यांनी मा.श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब यांना दिले.त्याबद्दल चव्हाण साहेबांनी मा. पुस्तके सरांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐💐
तसेच आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर पाहावयास मिळतात. आज मा. सौ. सुप्रिया पाटसूपे ताई यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारून महिलांसाठी तसेच समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध खंबीरपणे उभे राहून लोकांना कसा न्याय मिळवून देता येईल. अन्यायाविरुद्ध कसा लढा उभारता येईल. आणि लोककल्याणासाठी काही काम करता आले तर मी माझे भाग्य समजते असे आश्वासन माननीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण साहेब यांना दिले. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी आज समाजामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन काम करावयाची किती काळाची गरज आहे याबद्दलही चर्चा केली. आणि आवाहन केले की सर्व महिलांनी पुढाकार घेऊन स्वतःच सक्षम होऊन स्वतःबरोबर इतर महिलांचे ही संरक्षण करावे. यासाठी ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION सदैव आपल्या बरोबर असेल असे आश्वासन दिले.