महाबळेश्वर तालुक्यात सत्तेचे सिंहासन डळमळले.तालुकाध्यक्ष उत्तम भालेरावांच्या नेतृत्वात वंचितचा स्वबळाचा महाएल्गार, प्रस्थापितांची झोप उडाली.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर तालुक्यात सत्तेचे सिंहासन डळमळले.तालुकाध्यक्ष उत्तम भालेरावांच्या नेतृत्वात वंचितचा स्वबळाचा महाएल्गार, प्रस्थापितांची झोप उडाली.

महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा झाल्याने सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही केवळ निवडणूक घोषणा नसून, सत्तेच्या अहंकाराला दिलेला थेट राजकीय धक्का असल्याचे स्पष्ट होत आहे.
उत्तम भालेराव यांनी तालुक्यातील जनतेचा असंतोष एकत्र करत, “आता तडजोड नाही, अन्यायाला थेट उत्तर” अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्या नेतृत्वात संजय भालेराव व सिद्धार्थ यादव यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे ढासळली आहेत.
वर्षानुवर्षे सत्तेत राहून महाबळेश्वर तालुक्याला केवळ मतपेटीपुरते मर्यादित ठेवणाऱ्या राजकीय शक्तींविरोधात उत्तम भालेराव यांनी उघड रणशिंग फुंकले आहे. आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, युवक व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण करणाऱ्यांना आता जनतेच उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तम भालेराव हे संघर्षातून उभे राहिलेले, सत्तेला न घाबरणारे आणि अन्यायाविरोधात थेट रस्त्यावर उतरलेले नेतृत्व म्हणून तालुक्यात ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरल्याने अनेक ‘सेफ’ समजले जाणारे गण अचानक धोक्याच्या छायेत आले आहेत. परिणामी प्रस्थापित नेत्यांमध्ये घबराट, गुप्त बैठका, अंतर्गत फूट आणि कुरघोड्यांना उधाण आले आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे महाबळेश्वर तालुक्यातील ही निवडणूक आता साधी राजकीय लढत न राहता, बहुजन समाज विरुद्ध सत्तेची मक्तेदारी अशी थेट आणि निर्णायक लढाई बनली आहे. वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार आणि उत्तम भालेराव यांचे आक्रमक नेतृत्व सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
महाबळेश्वर तालुक्यात परिवर्तनाची ठिणगी पेटली असून, उत्तम भालेराव यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा एल्गार म्हणजे प्रस्थापित राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे.




