क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारती विद्यापीठ:-(पुणे)-मैत्रिणी सोबत ब्रेकअप झाल्याच्या रागातुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक – भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) मैत्रिणी सोबत ब्रेकअप झाल्याच्या रागातुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक – भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

दि. ०२/०२/२०२६ रोजी रात्रौ ०८/३० वा. चे सुमारास यातील फिर्यादी आदित्य सुनिल कांबळे वय २० वर्षे धंदा- शिक्षण रा. फ्लट नं. ५०१ एस. के. रेसिडन्सी श्री कटील हॉटेल जवळ, नन्हेगाव, पुणे व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय २४ वर्षे व्यवसाय फलेक्स प्रिंन्टीग रा फलॅट नं ३०८ बी विंग समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले असताना फिर्यादी याने आरोपीस त्याचे मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांचेत भांडण लावून, त्याने कॉल केल्याचे रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंतीगृहातील ऊस तोडायचे हत्यार घेवुन “आज तुला जिवंत सोडणार नाही “असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास ऊस तोडायचे हत्याराने वार करुन गंभिर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भारती विदयापीठ पो स्टे येथे गुन्हा रजि नं ३९/२०२६ भा न्या सं कलम १०९,११८(२) आर्म अॅक्ट क ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये दिनांक ०३/०२/२०२६ रोजी गुन्हा नोंद केला.

आरोपी चेतन चव्हाण याचा शोध घेणे करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांनी पथके तयार करून रवाना केली. त्याप्रमाणे सपोनि गणेश मोहिते, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गुन्हयातील आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय २४ वर्षे रा फलॅट नं ३०८ बी विंग समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे हा वंडरसिटी येथील हायवेच्या सर्व्हस रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात आज दिनांक ०४/०२/२०२६ रोजी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गणेश मोहिते, सहा पोलीस निरीक्षक, हे करित आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. अमितेश कुमार, साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, साो. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री राजेश बनसोडे, साो. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री मिलींद मोहिते साो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, मा.श्री. धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार खिलारे भारती विदयापीठ पो स्टे पुणे व भारती विदयापीठ पो स्टे कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली आहे.

(राहुलकुमार खिलारे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदया पो स्टे, पुणे शहर

चोरमोले अण्णा

2) विधीसंघर्षित बालकाकडून एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत – भारती विद्यापीठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

दिनांक ०४/०२/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक हा नवले पुंलाकडुन कात्रज कडे येणारे मुख्य रोडचे दरम्यान राधाकृष्ण गार्डन समोरील बाजुचे सव्हींस रोडवर थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता एक विधीसंघर्षीत बालक हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टसहीत दिनांक ०४/०२/२०२६ रोजी २०.१५ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करुन, त्याचेकडे तपास करता त्यास सदरचा गावठी कट्टा हा त्याचा साथीदार सोमनाथ चांदणे याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४२/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

(राहुल खिलारे)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button