पाचगणी:-शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा.
पाचगणी दि: मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी पुरोगामी विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय,,, असा जयघोष करून कामकाजाला सुरुवात झाली. त्याच शिवसेनेमध्ये दोन शकले पडल्यानंतर प्रथमच सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या कामाची पुस्तिका तसेच दिवाळीचा फराळ पाठवून प्रथमच शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छाचे वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, माऊली शेलार व त्यांचे सहकारी हे आठवड्यापासून करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यानंतर प्रत्येक मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेचा बुलंद आवाज भगव्या ध्वजासह गगनात पोहोचला होता. संपूर्ण महाराष्ट्रात अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मंत्री, खासदार, आमदार बनवून खऱ्या अर्थाने शिवसेनेने मराठी माणसालाच नव्हे तर इतर धर्मियांना सुद्धा संधी दिली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे मराठी माणसांचा श्वास आणि मराठी माणसाचा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीनिमित्त प्रथमच शिवसैनिकांच्या हाती शासन आपल्या दरबारी व शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच ताजा फराळ देण्यात आला.
विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते जावळी व महाबळेश्वर, वाई , कराड, पाटण, सातारा, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावातील शिवदूत व बूथ प्रमुख यांच्यापर्यंत ही दिवाळीचे भेट व शुभेच्छा देण्यात येत आहे. यासाठी शिवसैनिक सुद्धा परिश्रम घेत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधीही दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. पण, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली शिवसैनिकांना दोन वेळचे जेवण व चहापान तसं थंडगार पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा निर्माण करण्यात आले होत्या.
खऱ्या अर्थाने आझाद मैदानावर झालेल्या या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक अक्षरशः विचाराने तसेच कृतीने नाहून निघाले. या त्यांच्या या उपक्रमाबद्दल व प्रामाणिक कामगिरीमुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, शरद कणसे,एकनाथ ओंबळे, सौ.शारदा जाधव, विजय पाटील, निलेश मोरे, महेश गोडसे, बाळासाहेब जाधव तसेच अनेक मान्यवरांनी गावोगावी जावून त्यांचा संदेश शिवसैनिक व त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याची कामगिरी बजावत आहेत.
मराठा व धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राज्य सरकार आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कोणतीही अडचण येऊ नये .यासाठी कायदे तज्ञांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करत आहेत. त्यामुळे सध्या शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे व त्यांचे शिलेदार असे समीकरण झालेले आहे. खऱ्या अर्थाने शिवशाही अस्तित्वात आणल्याचे चित्र पाहायला मिळते. असे शिवसैनिक छातीठोक पणाने सांगू लागले आहे.
एकेकाळी शिवसैनिक म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा सैनिक होता. कधी काळी उपाशी राहून समाजकार्यांमध्ये धावून जाणारे शिवसैनिकांना कधी कधी दिवाळी साजरा करता आली नाही. पण, प्रथमच दिवाळीनिमित्त थेट मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली भेट व शुभेच्छा यामुळे सामान्य शिवदूत व बुथ प्रमुख भारावून गेले आहेत. या दमदार कामगिरीबद्दल आता आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे किमान पाच खासदार नवी दिल्लीच्या नवीन संसदेत दिसतील असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.
—————————————————-
फोटो -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या फराळ व संदेशाचे वितरण करताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव व एकनाथ ओंबळे (छाया- अजित जगताप, पाचगणी)