पाटण प्रांताधिकारी श्री सुनील गाढेंच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांनी केला सत्कार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
पाटण प्रांताधिकारी श्री सुनील गाढेंच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांनी केला सत्कार.
पाटण दि: निसर्गाचे वरदान लाभलेल्या पाटण तालुक्यामध्ये अनेक हिरे रत्न तयार झालेले आहेत. या पाठीमागे प्रशासकीय अधिकारी यांचाही मोठा सहभाग आहे. कोयना धरणाच्या निर्मितीने संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या पाटण तालुक्याच्या भूमीमध्ये मनाचा मोठेपणाही दडलेला आहे. पाटणचे प्रांताधिकारी श्री सुनील गाढे हे सामान्य माणसाची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा सर्वांपर्यंत पोहोचवत होते. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दस्तुरखुद पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रांतांचा सत्कार करून एक आगळे वेगळे दर्शन घडवले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाटण तालुक्यातील वाड्या वस्तीमध्ये जाऊन राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पाटणचे प्रांताधिकारी श्री सुनील गाढे हे प्रयत्नशील असतात .त्यांना महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांसोबतच शासकीय अधिकाऱ्यांचीही मोलाची साथ मिळत आहे. आनंदाचा शिधा दिवाळीनिमित्त कातकरी समाजापर्यंत पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम श्री गाढे व पाटणचे तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने गावकुसाबाहेरील डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या कातकरी समाजाला न्याय मिळाला. त्यांची दिवाळी गोड झाली.
श्री गाढे यांच्या वाढदिवस दोन दिवसांपूर्वी असतानाही प्रशासकीय कामकाजामध्ये प्राधान्य देऊन काम करणारे प्रांताधिकारी म्हणून त्यांची ख्याती बनली आहे.म्हणूनच राज्यातील वजनदार मंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या मरळी त्या पाटण येथील भूमीमध्ये स्वतःचा भव्य दिव्य वाढदिवस विसरून थेट प्रांताधिकारी श्री सुनील गाढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वतः सत्कार केला. हा दुर्मिळ योगायोग आहे.
राज शिष्टाचाराप्रमाणे मंत्री महोदयांचा वाढदिवस अधिकारी वर्ग करत असतात पण कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकून त्यांचा उत्साह वाढवणे. तसेच त्यांचाही वाढदिवस साजरा करणे. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तो मनाचा मोठेपणा श्री शंभूराज देसाई यांनी दाखवला आहे. त्याबद्दल या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे .सध्या प्रसार माध्यमातून धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न असलेला अभाव मराठा व धनगर आरक्षणाबाबत होत असलेली आंदोलने, दुष्काळी परिस्थिती व इतर अनेक योजनांबाबत चर्चा होते पण वाढदिवसानिमित्त जाहिरातीचाही पाऊस पाडून काही माध्यमाने आपली व्यवसायिक जबाबदारी समर्थपणाने पेलली आहे. हे सुद्धा या निमित्त अधोरेखित झालेले आहे.
————————-+-++——————
फोटो -वाढदिवसानिमित्त प्रांताधिकारी श्री गाढे यांचा सत्कार करताना पालकमंत्री देसाई (छाया- अजित जगताप, सातारा )