बनपुरी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनपुरी यांचा चिमुकल्यांचा बाल बाजार उत्साहात साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनपुरी यांचा चिमुकल्यांचा बाल बाजार उत्साहात साजरा.

बनपुरी :-
बनपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनपुरी यांचा चिमुकल्यांचा बाल बाजार भरविण्यात आला यावेळी सर्व प्रकारचा भाजीपाला संसार उपयोगी वस्तू मकर संक्रांतीच्या सणाचे साहित्य व खाद्य पदार्थ यांची रेलचेल होती या बाल बाजारास पालकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावचे प्रतिष्ठित नेते श्री.रामभाऊ देवकर, श्री .रवींद्र कांबळे, उपसरपंच श्री. तानाजी देवकर, माजी सभापती नानासो गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.श्यामलाल देवकर, व समितीचे सर्व सदस्य श्री संजय देवकर, अमित पाटोळे, भाऊसो देवकर, कोमल देवकर, अर्चना देवकर, अर्चना काशीद, प्रियांका लोहार , माजी अध्यक्ष अण्णासो देवकर, बनपुरी हायस्कूल बनपुरी चे मुख्याध्यापक श्री. रमेश देशमुख व त्यांचा शिक्षक स्टाफ, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व महिला यांनी बाल बाजारात खरेदी केली व मुलांना विक्रीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या बाल बाजारासाठी पडळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री . धनाजी पवार साहेब,गणेश वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .राजेंद्र बागल हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी मुलांचे कौतुक केले आणि बाल बाजारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. बनपुरी शाळेतील शिक्षक स्टाफच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या बाल बाजारामध्ये सुमारे 60 ते 70 हजार रुपयांची उलाढाल झाली असण्याची शक्यता शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासो बागल यांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. हा बाजार यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासो बागल,
तेजस्वी पवार, भाग्यश्री बागल, माधुरी चव्हाण, प्रकाश सानप, राजश्री जाधव आदींनी परिश्रम घेतले.




