आष्टी:-दुष्काळी परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके.
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आष्टी:-दुष्काळी परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके.

आष्टी तालुक्यातील , मोजे सुलेमान देवळा, येथील समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके यांचा वाढदिवस १४ नोव्हेंबर रोजी असतो. दुष्काळी परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता कोणत्याही पद्धतीचा सत्कार समारंभ व अन्य गोष्टी या फाटा देत. दुष्काळाची दाहकता लक्षात घेत. वन्यजीवांसाठी पानपोही व अन्नछत्र उभारण्याचा संकल्प आहे. शेतात पानवटे तयार करून नियमित पाणी सोडून, पशुपक्षी व प्राण्यांना जीवदान देण्याचे काम करण्याचा संकल्प आहे. आपण सुद्धा जर माझ्यावर प्रेम करत असाल तर, आपल्या शेतात व घरा जवळ , पशु पक्षांना पाणी नेहमी ठेवावे व त्यांना अन्न देण्याचे महत्त्वाचे कार्य आपण करावे . या दुष्काळाचा सामना करताना, पशुपक्षी व प्राणी जगवणे काळांची गरज आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा, एक घास चिऊ साठी एक थेंब पाणी चिऊ साठी, असा संकल्प करून वन्य जिव जगवा. पाण्याची बचत करत राहणं काळाची गरज आहे. माणुसकी धर्म जपणं व गरंजवंताला मदत करणं हे खूप दुष्काळ निवारणासाठी गरजेचे आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त, जो कोणी पशु पक्षांना अन्न पाणी व निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करेल, व गजवंत गोर गरिंब जनतेला माणुसकी धर्माने मदत करील त्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाचा असतील. बाकी कोणताही देखावा माझ्या वाढदिवसानिमित्त होणार नाही._




