ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाटण:-कार्यकर्त्यांची साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद – पालकमंत्री शंभूराज देसाई

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पाटण:-कार्यकर्त्यांची साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद – पालकमंत्री शंभूराज देसाई

दौलतनगर येथे शिवदौलत बँकेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दौलतनगर : दौलतनगर येथे शिवदौलत बँकेच्या वतीने आयोजित पारंपरिक दिवाळी फराळ कार्यक्रम पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “माझ्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांनी प्रत्येक सुख-दुःखात माझी साथ दिली. कार्यकर्त्यांची साथ आणि विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांनी पाटण तालुक्याला मिळवून दिलेला राजकीय दबदबा, दरारा आणि लौकिक कायम राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

तसेच राज्यभर मंत्री म्हणून काम करत असतानाही पाटण मतदारसंघातील विकासकामांकडे आपले सातत्याने लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई (दादा) यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
दिवाळीच्या परंपरेला जपत कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते दृढ करणारा हा फराळ कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button